
समांतर क्रांती / अळणावर
ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना अळणावर तालुक्यातील कटबगट्टीजवळ घडली. या अपघातात मृत झालेले तिघेही सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगीचे आहे. हणमंत मल्लाड (३६), महांतेश चव्हाण (३७) महादेवप्पा हुलळ्ळी (३९) अशी त्यांची नावे आहेत.
सोमवारी (ता.२३) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. ट्रक शिरसंगीहून गोव्याकडे निघाला होता तर ट्रॅव्हलर टेम्पो चित्रदूर्गकडे निघाला होता. कटबगट्टीजवळील वळणावर वाहन चालकांना अंदाज न आल्याने हा अपघात घडला.

खानापूर: वेगवेगळ्या दोन अपघातात दोघे जखमी
करंबळजवळ ट्रकचा, तर मलप्रभा ग्राऊंडजवळ दुचाकीचा अपघात समांतर क्रांती / खानापूर नंदगड रस्त्यावर करंबळजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर ट्रकचा समोरील भाग चाक्काचूर झाला आहे. सदर ट्रक नंदगडहून खानापूरकडे येत होता. दरम्यान करंबळ-कौंदलदरम्यानच्या वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा […]