समांतर क्रांती / खानापूर
येथील भू-विकास बँकेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची बनते. पण, यावेळी सर्वपक्षीयांच्या सहकार्यातून बँकेच्या १५ पैकी १३ संचालकांची निवड अविरोध करण्यात आली आहे. केवळ गर्लगुंजी आणि कक्केरी या दोन मतदार संघातील निवड अविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे शनिवारी (ता.२८) निवडणूक होणार आहे.
अविरोध निवड झालेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची भूविकास बँकेवर चौथ्यांदा वर्णी लागली आहे. तर ते अध्यक्षपदाची हॅटट्रीक साधण्याची शक्यता आहे. त्यांची चापगाव मतदार संघातून निवड झाली आहे. त्यांच्याच पुढाकाराने ही निवडणूक अविरोध करण्यात आली. निवडणूक अविरोध करण्यासाठी मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे नेते संजय कुबल, प्रमोद कोचेरी यांनी विशेष प्रयत्न केले.
सामान्य गटात चापगाव मतदार संघातून विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील (जळगा) यांच्यासह पारिश्वाडमधून अशोक बाबू पाटील (चिकदिनकोप्प), इटगीतून सुदीप बसनगौडा पाटील (इटगी), नंदगडमधून नारायण नागाप्पा पाटील (बिजगर्णी), जांबोटीतून लक्ष्मण खेमा कसर्लेकर (आमटे), हलशीतून सुभाष निंगाप्पा गुरव (हलशी), महिलांसाठी आरक्षित असलेल्या दोन जागांसाठी मणतुर्गा मतदार संघातून लक्ष्मी शिवाप्पा पाटील (तिओली) आणि बेकवाडमधून सुलभा धनाजी आंबेवाडकर यांची अविरोध निवड झाली आहे.
तसेच मागासवर्ग गटात इदलहोंड मतदार संघातून सुनिल विठ्ठल चोपडे (माळ अंकले), अल्पसंख्यांक गटातून माडीगुंजीचे कुतुबुद्दीन उस्मानसाब बिच्चन्नाव, अनुसुचीत जाती गटातून खानापूरचे यमनाप्पा चंदप्पा राठोड, अनुसुचीत जमातीतून बिडी मतदार संघातून गोल्लीहळ्ळीचे श्रीकांत सहदेव करजगी तर बिनकर्जदार गटातून जांबोटीचे शंकर विष्णू सडेकर-जांबोटीकर यांची अविरोधक निवड करण्यात आली आहे.
कर्जदारांच्या दोन जागांसाठी दि. २८ रोजी निवडणूक होणार आहे. गर्लगुंजी मतदार संघातून बरगावचे विरुपाक्ष महादेव पाटील व निडगलचे तानाजी दत्तू कदम तर कक्करी मतदार संघातून प्रकाश सोमनिंग अंग्रोळी व निळकंठ कृष्णाजी गुंजीकर हे आमने-सामने आहेत.
One thought on “खानापूर भूविकास बँकेचे १३ संचालकांची अविरोध; दोन जागांसाठी शनिवारी निवडणूक”