समांतर क्रांती / खानापूर
येथील पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबीत करण्यात येत असल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. सी.टी.रवी प्रकरणात केलेली हयगय मंजुनाथ नाईक यांना भोवली आहे.
गुरूवारी (ता.१९) रोजी हिरेबागेवाडी येथून भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना खानापूरले आणले होते. तत्पूर्वी, खानापूर पोलिस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना करण्यात आली होती. पण, नाईक यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्था हताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल मंजुनाथ नाईक यांना निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
या फोटोने घेतला बळी..
मंजुनाथ नाईक यांची सर्वसामान्य नागरीकांशी वर्तणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता.आमदार सी.टी.रवी यांना अटक झालेली असतांनाही त्यांच्याशी मात्र नाईक हे सौजन्याने वागत असल्याचे त्या दिवशी सर्वच अधिकाऱ्यांनी पाहिले होते. त्याशिवाय भाजपच्या नेत्यांना पोलिस स्थानकात ‘व्ही.आय.पी.’ ट्रीटमेंट देण्यात नाईक यांनी कोणतीच कसर सोडली नव्हती. त्यामुळे त्यांना हे प्रकरण भोवले.
अखेर थ्री स्टार गेले..
पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्याबद्दल खानापूर तालुक्यातून अनेक तक्रारी होत्या. त्याशिवाय त्यांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत होता. येथील लॉजवरील छापाप्रकरणातही त्यांची भूमीका संशयास्पद होती. त्यामुळे त्यांच्या बदलीचा अंदाज सर्वप्रथम ‘समांतर क्रांती’ने वर्तविला होता. नाईक यांची वर्तणूक प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिल्याने त्यांच्याबद्दल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
2 thoughts on “खानापूरचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक निलंबीत”