समांतर क्रांती / खानापूर
शिवारात हैदोस घातलेल्या हत्तीनी थेट सावरगाळी गावाच्या वेशीपर्यंत मजल मारली आहे. हत्ती मुक्तसंचार करीत असल्याने ग्रामस्थात दहशत पसरली आहे. हत्ती चवताळले असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीना हुसकावून लावण्याची मागणी होत आहे.
गेला आठवडाभर चार हत्तीचा कळप सावरगाळी परिसरात शिवारात तळ ठोकून आहे. आठवड्यात दोन वेळा हत्तीनी ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांच्या ऊसाचे तसेच शेती अवजारांचे प्रचंड नुकसान केले. अन्य शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान केले असून त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे.
हत्ती मुक्तसंचार करीत असल्याने शेतकरी शेतात जायला घाबरत होते. आता मात्र हत्तीनी चक्क वेशीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एक हत्ती पाटील यांच्या गावाजवळील शेतात मुक्तपणे वावरत होता. या परिसरात लोकांची वर्दळ असते. त्यामुळे धोका वाढला आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी वनखात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
खोटं कोण बोलतंय? भाजप आमदार की नेते?
वृत्तविश्लेषण / चेतन लक्केबैलकर गेल्या आठवडाभरापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ज्या कांही मर्कटलिला चालविल्या आहेत, त्याला काय म्हणावे? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांस पडला आहे. भाजप आमदार सी.टी.रवी यांच्या ‘त्या’ अश्लिल वक्तव्यानंतर सुरू झालेल्या रणकंदनात राज्यातील भाजपची एक तर खानापूरच्या भाजप नेत्यांची दुसरीच भूमिकाआहे. ती उमगण्याच्या पलिकडची असून यामुळे भाजपच्या नेत्यांनी स्वत:चेच हसू करून घेतले. त्याची जाणीव […]