समांतर क्रांती / खानापूर
येथील भूविकास बँकेच्या आज शनिवारी (ता.२८) झालेल्या निवडणुकीत गर्लगुंजीतून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांचा एकतर्फी विजय झाला. तर कक्केरी मतदार संघात प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली, त्यात निळकंठ गुंजीकर यांना संचालकपदाची लॉटरी लागली.
बँकेच्या १५ पैकी १३ जागांवर यापूर्वी संचालकांची अविरोध निवड झाली होती. पण, गर्लगुंजी आणि कक्केरी या दोन मतदार संघात समेट घडवून आणण्यात यश आले नव्हते. आज या दोन जागांसाठी मतदान झाले. गर्लगंजी विभागातून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांना ३४ पैकी २२ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी तानाजी कदम (निडगल) यांना १२ मते मिळाली. कक्केरी विभागातून प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. चिठ्ठीद्वारे संचालक निवडण्याचा निर्णय यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला. त्यात निळकंठ गुंजीकर हे विजयी ठरले.निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर येथील शिवस्मारकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून जल्लोष साजरा करण्यात आला.
१३ संचालकांची अविरोध निवड
सामान्य गटात चापगाव मतदार संघातून विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील (जळगा) यांच्यासह पारिश्वाडमधून अशोक बाबू पाटील (चिकदिनकोप्प), इटगीतून सुदीप बसनगौडा पाटील (इटगी), नंदगडमधून नारायण नागाप्पा पाटील (बिजगर्णी), जांबोटीतून लक्ष्मण खेमा कसर्लेकर (आमटे), हलशीतून सुभाष निंगाप्पा गुरव (हलशी), महिलांसाठी आरक्षित असलेल्या दोन जागांसाठी मणतुर्गा मतदार संघातून लक्ष्मी शिवाप्पा पाटील (तिओली) आणि बेकवाडमधून सुलभा धनाजी आंबेवाडकर यांची अविरोध निवड झाली आहे.
तसेच मागासवर्ग गटात इदलहोंड मतदार संघातून सुनिल विठ्ठल चोपडे (माळ अंकले), अल्पसंख्यांक गटातून माडीगुंजीचे कुतुबुद्दीन उस्मानसाब बिच्चन्नाव, अनुसुचीत जाती गटातून खानापूरचे यमनाप्पा चंदप्पा राठोड, अनुसुचीत जमातीतून बिडी मतदार संघातून गोल्लीहळ्ळीचे श्रीकांत सहदेव करजगी तर बिनकर्जदार गटातून जांबोटीचे शंकर विष्णू सडेकर-जांबोटीकर यांची अविरोधक निवड करण्यात आली आहे.
निवडणूक अविरोध करण्यासाठी माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे नेते संजय कुबल, प्रमोद कोचेरी, काँग्रेस नेते यशवंत बिर्जे यांनी प्रयत्न केले. तर निवडणूक अविरोध करण्यासाठी विद्यमान चेअरमन मुरलीधर पाटील यांनी पुढाकार घेतला. लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून मुरलीधर पाटील हे हॅटट्रीक साधण्याची शक्यता आहे.
माचीगड येथे उद्या साहित्याचा जागर
समांतर क्रांती / नंदगड माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील. गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी […]