Big Breaking: Lokayukt Raid येथील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगावातील घरावर पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा मारल्याने खळबळ माजली आहे. त्यांच्या घरातील कागदपत्रांची पडताळणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चालविली आहे. यात मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. तहसीलदार गायकवाड यांच्याबद्दल अलिकडेच एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाराचा गैरवापर करून ते खानापूर तालुक्यातील जमिनी बळकावत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर झालेल्या लोकायुक्तांच्या कारवाईने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.
खानापूर को-ऑप बँक निवडणूक: बाळासाहेब शेलारांनी स्पष्टच सांगितले..
समांतर क्रांती / संवाद खानापूर को-ऑप बँकेची निवडणूक ही शेलारविरुध्द शेलार अशी नसून सत्य विरूध्द असत्य अशी आहे. विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनेलच्या विरोधात आमची लढाई आहे. तेथील गैरव्यवहाराविरोधात आम्ही मैदानात उतरलो आहोत. लोकभावनेचा आदर करून सभासदांना न्याय देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचा दावा उमेदवार बाळासाहेब महादेव शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला. बाळासाहेब शेलार हे बँक […]