बंगळूर: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे रद्द झालेले बेळगाव येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन पुन्हा आयोजीत करण्यात येणार आहे. त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा हा अधिवेशनाचा कार्यक्रम २१ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.
२७ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेले सर्व कार्यक्रम २१ जानेवारीला बेळगावात होणार असून, त्या दिवशी सकाळी गोल्डन मेथोडिस्ट चर्चसमोर महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील सीपीडी मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खानापूरच्या तहसिलदारांची कोटी-कोटी उड्डाणे: किती मालमत्ता सापडली?
समांतर क्रांती / बेळगाव खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड बेळगावातील घरासह कार्यालय आणि इतर ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी आज बुधवारी (ता.८) छापा मारला. यात त्यांच्याकडे एकूण ४ कोटी ४१ लाख १२ हजार ५८१ रुपयांची मालमत्ता सापडली आहे. त्यांनी ही माया कशी जमविली, याबाबत लोकायुक्त पोलिस तपास करीत आहेत. तसेच यासंबंधी कर्नाटक लोकायुक्त कायद्यानुसार बेळगाव पोलिस स्थानकात […]