समांतर क्रांती / बेळगाव
खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड बेळगावातील घरासह कार्यालय आणि इतर ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी आज बुधवारी (ता.८) छापा मारला. यात त्यांच्याकडे एकूण ४ कोटी ४१ लाख १२ हजार ५८१ रुपयांची मालमत्ता सापडली आहे. त्यांनी ही माया कशी जमविली, याबाबत लोकायुक्त पोलिस तपास करीत आहेत. तसेच यासंबंधी कर्नाटक लोकायुक्त कायद्यानुसार बेळगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
पहाटे येथील तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव-गणेशपूर (लक्ष्मीटेक) येथील ‘कुबेर’ बंगला, खानापुरातील हलकर्णी-कलमेश्वरनगर येथील निवासस्थान, तहसिलदार कार्यालय तसेच निपाणी येथील नवनाथ चव्हाण यांचे फार्महाऊससह अन्य एक घर आणि अकोळ येथील सासऱ्यांच्या घर असे आठ ठिकाणी एकाचवेळी लोकायुक्त पोलिसांनी छापा मारला. या सर्व ठिकाणी संशयास्पद कागदपत्रे आढळली असून त्यांच्याकडे एकूण ४ कोटी ४१ लाख १२ हजार ५८१ रुपयांची मालमत्ता सापडली आहे.
प्रकाश गायकवाड यांच्याकडे दोन प्लॉट, तीन बंगले, २८ एकर शेती अशी एकुण ३ कोटी ५८ लाखांची स्थावर मालमत्ता तसेच ४६ हजारांची रोकड, २५ लाख ६६ हजार ५८५ किमतीचे दागिणे, ५७ लाखांची वाहने अशी एकुण ८३ लाख १२ हजार ५८५ रुपयांची जंगम मालमत्ता आढळली आहे.
२१ कोटींची मालमत्ता सापडली
राज्यातील बंगळूर शहर, चिक्कमंगळूर, बिदर, बेळगाव, तुमकूर, गदग, बळ्ळारी आणि रायचूर येथील अधिकाऱ्यांवर छापेमारी करून गुन्हे नोंदविले आहेत. त्यासाठी एकुण ३८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली त्यात २१ कोटी ०५ लाख १५ हजार ७४५ रुपयांची मालमत्ता आढळली आहे. सर्वच अधिकाऱ्यांनी तब्बल १४ कोटी ०३ लाख ३५ हजार १८८ रुपये इतकी रक्कम भूखंड आणि अलिशान बंगले खरेदीत तर एक कोटी ९८ लाख ९१ हजार २९१ इतकी रक्कम दागिणे खरेदीत गुंतविली आहे. त्याशिवाय या अधिकाऱ्यांनी २ कोटी ११ लाख ५३ हजारांची अलिशान वाहने खरेदी केली असल्याचे लोकायुक्तांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
गोधोळी ग्रा.पं.सदस्याच्या भावाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा
समांतर क्रांती / खानापूर गोधोळी येथील ग्राम पंचायत सदस्याच्या भावाने घरात कुणीही नसतांना एका विवाहीतेचा विनयभंग केला. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. नंदगड पोलिसात संशयीतावर विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल सलमेश्वर कल्लाप्पा कदम याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, पिडीत […]