समांतर क्रांती / खानापूर
जळगे येथे गेल्या दोन महिन्यांपासून हैदोस मांडलेल्या टस्कराला जेरबंद करून शिमोग्याला हलविण्यात वनखात्याला यश आले आहे. त्यासाठी शिमोगा येथील चार प्रशिक्षीत हत्तींचा वापर करण्यात आला. या मोहीमेत शिमोगा येथील ३० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
गेल्या दोन महिन्यांपासून टस्कराने जळगा गावाच्या भोवताली असलेल्या पिकांमध्ये धुडगूस चालविला होता. त्याला जंगलात हुसकावून लावण्याची मागणी ग्रमस्थांतून होत होती. काल बुधवारी (०८) रात्री शिमोगा येथील चार प्रशिक्षीत हत्तींसह कर्मचारी खानापुरात दाखल झाले. रात्रीच टस्कराचा शोध जारी करण्यात आला होता. पण, अंधारामुळे त्याला जेरबंद करणे शक्य झाले नाही. त्यामुळे पुन्हा सकाळी शोध माहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, गावाच्या शेजारील ऊसाच्या मळ्यात टस्कराचा माग लागल्याने डॉ. सुरेश यांनी हत्तीला बेशुध्द केले. हत्तीचा शोध घेण्यासाठी यावेळी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला.
टस्कराला चार प्रशिक्षीत हत्तींच्या सहाय्याने ट्रकपर्यंत आणण्यात आले. यावेळी टस्कराच्या पायाला दोरखंड बांधण्यात आला होता. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी टस्कराला ट्रकमध्ये घालून त्याची शिमोगा येथे रवानगी करण्यात आली. यावेळी ही मोहीम पाहण्यासाठी जळगे, चापगाव, करंबळ या जवळच्या गावांसह खानापूर शहर आणि परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच जमावात महिलांची संख्या लक्षणीय होती. जमावाला आवरण्यासाठी घटनास्थळी पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता.
खानापूर तालुक्यात तीन गटात दहा हत्ती आहेत. त्यातील दोन कळप नंदगड, गुंजी वनपरिक्षेत्रात आहेत. तर हा टकच टस्कर स्वतंत्रपणे जळगेतील शिवारात वावरत होता. त्याच्यामुळे जिवीतास हानी पोहचण्याची अधिक शक्यता होती. त्यामुळे त्याला याठिकाणाहून हलविण्यात येत आहे. अन्य दोन कळपांचा बंदोबस्त करण्यासंबंधी वनखात्याने उपाययोजना आखल्या आहेत.
- मंजुनाथ चव्हाण, मुख्य वनसंरक्षणाधिकारी बेळगाव
खानापूर: ट्रेलरखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू
समांतर क्रांती / खानापूर पॉवर ट्रेलरद्वारे शेतीची मशागत करतांना त्याखाली सापडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वड्डेबैल (ता. खानापूर) येथे आज गुरूवारी (ता.९) सायंकाळी घडली. या घटनेत अशोक पुंडलिक पाटील (६०) हे ठार झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती अशी, शेतकरी अशोक पाटील हे मिरची लागवडीसाठी शेतीत स्वत:च्या पॉवर ट्रेलरने मशागत […]