समांतर क्रांती / खानापूर
पॉवर ट्रेलरद्वारे शेतीची मशागत करतांना त्याखाली सापडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वड्डेबैल (ता. खानापूर) येथे आज गुरूवारी (ता.९) सायंकाळी घडली. या घटनेत अशोक पुंडलिक पाटील (६०) हे ठार झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती अशी, शेतकरी अशोक पाटील हे मिरची लागवडीसाठी शेतीत स्वत:च्या पॉवर ट्रेलरने मशागत करीत होते. अचानक पॉवर ट्रेलर मागे वळल्याने त्यांचा तोल गेला. ते खाली कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरून रोटरी (फाळ) गेल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. घटनेप्रसंगी तेथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिरक्तस्त्रावाने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. अशोक पुंडलिक पाटील हे वारकरी होते. गावातील वारकरी मंडळाचे ते प्रमुख होते. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
खानापूर को-ऑप बँक निवडणूक: ते आरोप हास्यास्पद..
समांतर क्रांती / खानापूर विद्यमान संचालक मंडळाने नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधक विकास पॅनेलने केला आहे. प्रत्यक्षात, त्या पॅनेलमध्ये तीन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. त्यांना नोकरभरती कशी झाली याबद्दल माहिती नाही का? नोकर भरती कुणाच्या देखरेखीखाली होते, याची माहिती नसलेले हे अशिक्षीत लोक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत आहेत, असा टोला विद्यमान संचालक मंडळाच्या सहकार […]