खानापूर : खानापूर – लोंढा महामार्गावर वाटरेनजीक दुचाकी घसरून पडल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचच्या सुमारास घडली. आकाश अरुण गवाळकर (22) व शिवराज विनोद जाधव (20, दोघेही राहणार मुंडवाड) हे या जखमीना खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील आकाश याची प्रकृती चिंताजनक आहे. आकाश व शिवराज हे खानापूरहून गावी मुंडवाडला निघाले असता त्यांची दुचाकी घसरून ते दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यात दोघांच्याही डोकीला जबर मार बसला आहे.
खानापूरचे नवे पोलिस निरीक्षक लालेसाब हैदरसाब गवंडी
समांतर क्रांती / खानापूर राज्यातील ४१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून खानापूरचे पोलिस निरीक्षक म्हणून सीआयडीचे लालेसाब हैदरसाब गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक मंजुनाथ नायक यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याजागी पट्टनशेटी यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली होती. मंजुनाथ नायक यांनी सी.टी.रवी यांना खानापुरला आणल्यानंतर केलेल्या कुचराईबद्दल निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे […]