समांतर क्रांती / खानापूर
राज्यातील ४१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून खानापूरचे पोलिस निरीक्षक म्हणून सीआयडीचे लालेसाब हैदरसाब गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक मंजुनाथ नायक यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याजागी पट्टनशेटी यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली होती.
मंजुनाथ नायक यांनी सी.टी.रवी यांना खानापुरला आणल्यानंतर केलेल्या कुचराईबद्दल निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण, त्यांच्या जागी पट्टनशेट्टी यांची नियुक्ती करून गृहखात्याने भाजपला मोठा धक्का दिला होता. आता लालेसदाब हैदरसाब गवंडी यांची खानापूरचे नवे पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
पोलिस प्रशिक्षण केंद्रात कलादगी..
येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील रिक्त असलेल्या जागी लोकायुक्त पोलिस निरीक्षक अजीज कलादगी यांची बदली करण्यात आली आहे. बदली झालेले अधिकारी तात्काळ पदभार सांभाळणार आहेत.
.. आणि त्याचे लष्करात जायचे स्वप्न अधुरेच राहिले
खानापूर: आकाशला भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवा करायची होती. त्यासाठी त्याची धडपड चालली होती. गेल्या काही महिन्यापासून तो घरच्यांपासून दूर राहून सैन्य भरतीच्या परीक्षेची तयारी करीत होता. उद्या सुट्टी असल्याने सैन्यात जाण्याची स्वप्ने छातीशी कवटाळून तो घरी जात असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला आणि त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्याची नुकताच लष्करात भरती झाली होती, असेही […]