खानापूर: आकाशला भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवा करायची होती. त्यासाठी त्याची धडपड चालली होती. गेल्या काही महिन्यापासून तो घरच्यांपासून दूर राहून सैन्य भरतीच्या परीक्षेची तयारी करीत होता. उद्या सुट्टी असल्याने सैन्यात जाण्याची स्वप्ने छातीशी कवटाळून तो घरी जात असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला आणि त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. त्याची नुकताच लष्करात भरती झाली होती, असेही त्याच्या मित्रानी सांगितले.
रामनगर – खानापूर मार्गावरील वाटरेनजीक जोमतळे वळणावर खानापूरहून गावी मुंडवाडला जात असताना पल्सर दुचाकी दुचाकी क्रमांक (केए २२ एच ४९४६) या दुचाकीचा येथील वळणावर वेगावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. या अपघातातील जखमी दुचाकीस्वार आकाश अरुण गवाळकर (२५) रा. मुंडवाड याला जखमी अवस्थेत खानापूर सरकारी रुग्णालयात आणले. पण त्याच्या डोकीला गंभीर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात आणले तेव्हा तो शुद्धीत होता, पण अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दुचाकी वर मागे बसलेला शिवराज विनोद जाधव (२५) (रा. मुंडवाड ता. खानापूर) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खानापूर येथे सरकारी दवाखान्यात प्रथम उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोंढा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक निरंजन स्वामी तसेच सहाय्यक उपनिरीक्षक एफ एस मुल्ला तसेच हवालदार विवेक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर घटनेमुळे मुंडवाड गावात शोककळा पसरली आहे.
नोकर भरती मेरीटवर केली असेल तर टक्केवारी जाहीर करा!
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को-ऑप बँकेतील नोकर भरती मेरीटवर झाल्याचे विद्यमान संचालकांचे म्हणणे असेल तर त्यांनी मेरीट यादी जाहीर करावी. आम्हीदेखील ज्यांना डावलण्यात आले अशांची यादी जाहीर करायला तयार आहोत, असे थेट आव्हान बँक विकास पॅनेलचे उमेदवार बाळासाहेब शेलार यांनी दिले आहे. नोकर भरतीत गैरव्यवहार झाला आहे, हा आमचा आरोप नितळ पाण्याइतका स्पष्ट आहे. […]