समांतर क्रांती / खानापूर
आम्ही बँकेच्या विकासासाठी धडपडत आहोत. त्यासाठी आम्ही विविध योजना राबवित आहोत. सभासदांना आम्ही करीत असलेल्या कामांवर विश्वास आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांना पराभवाची धास्ती असल्यामुळेच ते खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत, असे मत विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला आहे.
बँकेत सुसज्ज अशा लॉकरची व्यवस्था केली आहे. त्यातून वर्षाला साडेतीन लाखांचा नफा बँकेला होत आहे. त्याशिवाय शाखा वाढीमुळेदेखील बँकेच्या विकासवाढीत प्रगती होणार आहे. सहकार खात्याबरोबरच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचेदेखील पालन करावे लागते. कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कोणतेच कर्ज मंजूर करता येत नाही. आजच रिझर्व्ह बँकेने बेळगावातील एका बँकेवर अशा प्रकारात कारवाई केली आहे. त्यावरूनच आम्ही नियमावर का बोट ठेवले आहे, याचे प्रत्यंतर विरोधकांना यायला हवे. पण, ज्यांना बँक व्यवहाराबद्दल कांहीच माहिती नाही अशा काही अपमतलबी लोकांकडून मिळालेल्या खोट्या माहितीच्या आधारे आरोप करणभे हे कुणालाही शोभत नाही, असे अमृत शेलार म्हणाले.
ज्यांनी बँकेच्या कारभारावर आरोप केले आहेत, त्यांचा आगापिछा पाहिला असता, त्यांचा बँकेच्या व्यवहाराबाबत आरोप करण्याचा हेतू स्पष्ट होतो. ज्यांनी बँकेत केवळ आपली पोळी भाजून घेण्यासह सर्वसामान्य सभासदांना वेठीस धरले, त्यांच्या सांगण्यावरून आरोप करणे कितपत योग्य आहे. ज्यांनी आरोप चालविले आहेत, ते किती स्वच्छ आहेत? असा प्रश्न आम्ही उपस्थित केला तर त्याकडे त्यांचे उत्तर नसेल याची खात्री आहे. केवळ स्वत:चे पितळ पांढरे करून घेण्यात गुंतलेल्यांच्या प्रश्नांना मतदारच उत्तर देणार असल्याने आम्ही बँकेच्या विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी सांगितले.
शतकोत्तर परंपरा असलेल्या या बँकेच्या संचालक मंडळातून बाहेर पडून वेगळी चूल मांडलेल्यांनी बँकेच्या विकास काय योगदान दिले आहे? याचा खुलासा करावा. ज्यांनी सभासदांना नागविण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी नोकर भरतीत कांही न मिळाल्याने आम्हा विद्यमान संचालकांवर आरोपांच्या फैरी चालविल्या आहेत. ते साळसूदपणाचा आव आणत आहेत. पण, त्यांच्या खोट्या आणि बिनबुडाच्या आरोपांवर सभासदांचा काडीचाही विश्वास नाही. बँकेचे सभासद हे आमच्या कुटुंबाप्रमाणे आहेत, आम्ही व्यवहाराबरोबरच नात्यानाही महत्व दिले आहे, कारण आमचा अतूट नात्यांवर विश्वास आहे. आजपर्यंत आम्ही हे नाते जपले आहे, यापुढेही ते टिकविणार आहोत. याची खात्री मतदारांना सुध्दा आहे, असा विश्वास अमृत शेलार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
गावागावतून उदंड प्रतिसाद..
दरम्यान, बँक अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक गावातून सहकार पॅनेलला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मतदारांनीच विरोधकांना चपराक देतांना जे बाहेर पडले त्यांनी स्वत:ची ऐपत ओळखली होती. त्यांचे बँकेचे हित जपायचे नाही तर स्वार्थ साधायचे आहे, हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे मतदारांनी सहकार पॅनेलला विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
‘सहकार’विरुध्द ‘विकास’, कोण मारणार बाजी?
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळासाठी आज रविवारी (ता.१२) मतदान होणार आहे. विद्यमान संचालकांचे सहकार पॅनेल विरुध्द बँक विकास पॅनेल अशी झुंज होईल, यात कोण बाजी मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी चारपर्यंत मतदानाची प्रक्रीया पार पडेल, त्यानंतर मतमोजणी होणार असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. विद्यमान संचालकांच्या […]