बेळगाव: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील उर्फ आबांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांचे सुपुत्र आमदार रोहीत पाटील यांनी खानापूर म.ए.समितीच्या शिष्ठमंडळाला दिली. येथील युवा समितीने आज रविवारी (ता.१२) आयोजीत केलेल्या युवादिनाच्या कार्यक्रमाला आमदार रोहीत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. दिवंगत आर. आर. पाटील यांनी सीमाप्रश्नी विशेष योगदान दिले होते. बेळगांव येथे २००६ साली झालेल्या मेळाव्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आपणही त्याच जोमाने सीमावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
प्रसंगी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य गोपाळ पाटील, यशवंत पाटील, सागर पाटील, संतोष पाटील, विजय पाटील (गर्लगुंजी) व अन्य समितीनेते उपस्थित होते.
चुरशीने ७४ टक्के मतदान झाले, पण निकाल कायद्याच्या कचाट्यात
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को-ऑप बँकेचे मतदान चुरशीने पार पडले. पण, निकाल कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मतमोजणी १० ते पंधरा दिवसानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होईल, असे निवडणूक अधिकारी रविंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. सकाळपासून निर्धारित वेळेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले. गेल्या महिनाभरापासून खानापूर को-ऑप बँकेच्या निवडणुकीचीच चर्चा सुरू होती. शेलारविरुध्द शेलार अशा लढतीच्या पार्श्वभूमीवर […]