
खानापूर: बेळगाव येथे २१ रोजी होणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गुरूवारपासून (ता.१६) तालुक्यातील प्रत्येक जिल्हा पंचायत मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता पारिश्वाड, दुपारी ३ वाजता कक्केरी, शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता गर्लगुंजी, दुपारी ३ वाजता जांबोटी, शनिवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता लोंढा तर दुपारी ३ वाजता नंदगड जिल्हा पंचायत विभागाची बैठक होणार आहे.
या बैठकांना ब्लॉक अध्यक्ष, महिला घटक अध्यक्षा, अल्पसंख्यांक घटक अध्यक्ष, सर्व घटकांचे अध्यक्ष, आजी – माजी पदाधिकारी, जेष्ठ नेते, सर्व नॉमिनिटेड सदस्य, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी केले आहे.

खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरींच्या घरी बिबट्या
कारवार: उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांच्या शिरसीतील घरात सोमवारी (ता.१३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्यांने एन्ट्री मारली. कांही काळ बिबट्यांने आहाराचा शोध घेतल्यानंतर तेथून पळ काढला. खासदार कागेरी हे यावेळी घरात होते. रात्री घराच्या परिसरातील बागेतून बिबट्या घराच्या अंगणात आला. त्यांने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे कांही वेळाने […]