
समांतर क्रांती / खानापूर
उद्या शुक्रवारी (ता. १७) हुतात्मा दिली खानापूर तालुक्यातील जनतेने व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन म.ए.समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता स्टेशन रोडवरील हुतात्मा नागाप्पा होसूरकर स्मारकासमोर सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभीवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
उद्या मध्यवर्ती म.ए.समितीच्यावतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. त्याचबरोबर सकल मराठा समाजातर्फे बिंदू चौकात हुतात्म्यांना अबिवादन केले जाणार आहे. त्यासाठी सीमाभागातून मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनीदेखील उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील, अध्यक्ष गोपाळ देसाई, ता.पं.माजी सभापती मारूती परमेकर यांच्यासह समिती नेत्यांनी केले आहे.

जातगणना: कर्नाटकात मुस्लिम कोणत्या स्थानावर?
बंगळूर: जातीगणना हा सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. हा अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार का? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पण सरकारने पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची टूम काढली आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल मंडण्यापूर्वीच जात जनगणनेचा अहवाल फुटला आहे. अहवालाच्या अंमलबजावणीपूर्वीच माहिती फुटल्याने खळबळ उडाली आहे. लीक झालेल्या जात जनगणना अहवालात काय आहे? […]