
समांतर क्रांती / खानापूर
पोलिसांनी रस्त्या-रस्त्यावर, नाक्या-नाक्यावर थांबून दुचाकीस्वारांना दंड ठोठावले तरी त्याचा कांहीच परिणाम वाहन चालकांवर होत नाही. उलटअर्थी पोलिसांकडून लुबाडणूक होत असल्याची ओरड नेहमीचीच बनली आहे. त्यावर उपाय म्हणून शिक्षण खात्याकडून आज अनोख्या पध्दतीने हेल्मेटबाबत दुचाकी चालकांत जागृती करण्यात आली.
येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या स्काऊट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी शहरात जागृती फेरी काढली. यावेळी त्यांनी घोषणाबाजीतून वाहतुकीचे नियम पाळावेत तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, अशी हाक दिली. येथील शिवस्मारक चौकात पोलिस कर्मचारी महेश दानवाड यांच्या उपस्थितीत मानवी साखळी करून विद्यार्थ्यांनी जागृती केली. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्याऐवजी त्यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाबाचे फूल देऊन हेल्मेट वापरण्याची विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या गांधीगिरीने शिवस्मारक चौकात नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

जांबोटी- वडगावच्या जंगलात चाललंय काय; वनखात्याला सगळं माहितंच हाय!
समांतर क्रांती / खानापूर जांबोटी वनविभागातील वडगावच्या जंगलातून राजरोसपणे वृक्षतोड करून वाहतूक केली जात आहे. याबाबत नुकताच एकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील स्थानिक जंगल माफियांचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे या वृक्षतोडीत एका पंचायत कारभाऱ्यासह वडगावातील अनेक ‘मान्यवर’ व्यक्ती तसेच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने नेहमीच या प्रकाराकडे दुर्लक्ष करून वनखात्याकडून मूकसंमती दिली जात आहे. गेल्या […]