
खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सच्यावतीने शनिवारी (ता.२५) हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ७५०० रुपये व आकर्षक चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक चषक दिला जाणार आहे.
स्पर्धा एक गाव एक संघ तसेच खानापूर शहरासाठी दोन प्रभाग एक संघ याप्रमाणे खेळविली जाणार आहे. तसेच स्पर्धा दोन दिवसांची असल्याने आगाऊ नोंदणी व प्रथम आलेल्या संघांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी मिलिंद देसाई (7760688710) किंवा राजन सुतार (8139901919) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
होनकलजवळ अपघात: दुचाकीस्वार गंभीर जखमी
समांतर क्रांती / खानापूर दुचाकीला कारने ठोकरल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी (ता.२०) दुपारी घडली. तिंबोली-रामनगर येथील शंकर पाऊसकर (३८) हा दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. होनकल क्रॉस येथील दुभाजकांना ओलांडून दुसऱ्या बाजुला आलेल्या दुचाकीला कारची (जीजे १८ […]