
समांतर क्रांती / खानापूर
दुचाकीला कारने ठोकरल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी (ता.२०) दुपारी घडली. तिंबोली-रामनगर येथील शंकर पाऊसकर (३८) हा दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
होनकल क्रॉस येथील दुभाजकांना ओलांडून दुसऱ्या बाजुला आलेल्या दुचाकीला कारची (जीजे १८ बीडी १४५६) जोराची धडक बसली. यात शंकर हा कारच्या समोरच्या काचेवर आदळला. तर त्याची दुचाकी (फॅशन प्रो) रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. शंकर याच्या डोकीला गंभीर जखम होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याला तात्काळ खानापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले.
शंकर पाऊसकर हा वीट कामगार असून तो होनकल परिसरात कुटुंबीयासमवेत राहतो. आज तो खानापूरकडे येतांना हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

मुघवडेचा प्रवास धोक्याचा; लक्ष देणार कोण?
समांतर क्रांती / खानापूर खानापूर – जांबोटी रस्त्याला जोडणाऱ्या मुघवडे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेच; शिवाय चढ-उतार आणि नागमोडी वळणाच्या या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी या भागातील नागरीकांतून होत आहे. मुघवडे रस्त्यावर अल्लोळी, मळव, आंबोळी, बांदेकरवाडा, जोगणमठ, निलावडे, कोकणवाडा, मुघवडे आणि कबनाळी […]