समांतर क्रांती / फोंडा
दुचकीस्वारांना ठोकरून पळ काढलेल्या खानापुरातील टेंपो चालकास आज मंगळवारी (ता. २१) फोंडा पोलिसांनी अटक केली. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला मालवाहतूक टेंपोदेखील ताब्यात घेण्यात आला होता. या अपघातात एकजन ठार झाला होता. तर अन्य एकजण जखमी झाला आहे.
गुरूवारी (ता.१६) राष्ट्रीय महामार्गावर दयानंदनगर-धारबांदोडा येथे सकाळी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकी चालक महमदरफी हुसेनबाशा मोमीन (२८, भूमिकानगर-उसगाव, मूळचा कर्नाटक) याचा मृत्यू झाला होता. तर मागे बसलेला रोहित निकोलास कुजर (२०, भूमिकानगर,मूळ झारखंड) हा जखमी झाला आहे.
अज्ञात वाहनांने त्यांच्या दुचाकीला चुकीच्या दिशेने धडक दिल्याचे जखमीने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून वाहनाचा शोध जाती होता. दरम्यान, आज मंगळवारी फोंडा पोलिसांनी मारूती गावडा (५२, रा.खानापूर) यांना अटक केली असून अपघातास कारणीभूत टेंपोदेखील ताब्यात घेण्यात आला आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
रामनगरजवळ अपघातात चारजण जखमी
समांतर क्रांती / खानापूर धारवाड-पणजी महामार्गावरील चिंचेवाडी (ता.खानापूर) येथे आज मंगळवारी (ता.२१) सायंकाळी कारचा अपघात झाला असून त्यात चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रामनगर सरकारी रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी हुबळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुबळीहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार (केए ६३ एन ३८४६) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील दगडांना धडकली. तेथून […]