समांतर क्रांती / कारवार
कारवार जिल्ह्यातल्या यल्लापूर तालुक्यातील अरेबैल घाटात आज पहाटे फळे – भाजीपाल्या वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांना आणि जखमीना यल्लापूर येथील सरकारी आरोग्य केंद्रात सध्या दाखल करण्यात आले आहे.
हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथून ४० व्यापारी भाजीपाला आणि फळे भरून घेऊन या ट्रकमधून कुमटा येथे येत होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग ६३ वर अरेबैल घाटात गुल्लापूर जवळ हा अपघात घडला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असून या वर्षातील जिल्ह्यातील हा सर्वात मोठा अपघात घडला आहे. घटनास्थळी पोलीस व स्थानिकांच्या मदतीने मृतांना आणि जखमीना आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
निधन वार्ता: कमळाबाई पाटील
खानापूर: भालके खुर्द (ता.खानापूर) येथील रहिवासी कमळाबाई ईश्वर पाटील यांचे आज बुधवारी (ता.२२) सकाळी ८:०५ वाजता वृध्दापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव, सुना, दोन विवाहित कन्या, नातवंडे व पणतवंडे असा परीवार आहे. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता होईल. त्या श्री. रामचंद्र ईश्वर पाटील व श्री. गणपती ईश्वर पाटील यांच्या मातोश्री […]