खानापूर: भालके खुर्द (ता.खानापूर) येथील रहिवासी कमळाबाई ईश्वर पाटील यांचे आज बुधवारी (ता.२२) सकाळी ८:०५ वाजता वृध्दापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव, सुना, दोन विवाहित कन्या, नातवंडे व पणतवंडे असा परीवार आहे. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता होईल. त्या श्री. रामचंद्र ईश्वर पाटील व श्री. गणपती ईश्वर पाटील यांच्या मातोश्री व प्रेरणा सौहार्द सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक बाबाजी पाटील यांच्या आजी होत.
मृतात्म्यास चीरशांती लाभो. समांतर क्रांती परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली..!
बैलूर: भाजपच्या सदस्यांचाच पंचायत अध्यक्षांवर ‘अविश्वास’
समांतर क्रांती / खानापूर भाजपच्या सदस्यांनीच त्यांच्या ग्रा.पं. अध्यक्षांवर अविश्वास ठराव समंत पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. बैलूर ग्रा.पं.अध्यक्ष रामलिंग ओमानी मोरे यांच्या विरोधात आज बुधवारी (ता.२२) अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्यात १५ पैकी ११ सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात मतदान केले तर तिघांनी अध्यक्षांच्या बाजुने मतदान केले. एक सदस्य अनुपस्थित राहिले. तर अन्य एक सदस्य मयत […]