हनुमान गल्ली येथे पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. या शाळेत तीन महिला 2015 पासून येथे जेवण सिबंधी म्हणून काम करीत होत्या. त्यांना गेल्या सात वर्षात जातीवरून त्रास केला नाही किंवा आताही केला नाही. त्यामुळे जातीवारुन त्रास देण्याचा प्रश्नच नाही. सरकारी नियमानुसार शाळेत जर अडुगे सिबधींनी त्यांना दिलेल्या साहित्याचा दुरपयोग केल्याचे आढळून आले तर किंवा त्यांच्यात इतर गैरवर्तन दिसून आले तर त्यांना त्वरित कामावरून कमी करू शकतो, असा नियम आहे. त्याच्या आधारावर मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन आम्ही त्यांना कामावरून कमी केलेले आहे. असे यावेळी पालकांनी सांगितले.
मुलांना जेवण बनवून देणाऱ्या सिबंधिकडून योग्य असा पोषण आहार मुलांना द्यावा, अशी आमची अपेक्षा होती, पण या सिबंधीमध्ये शाळेतच एकमेकांशी वाद होत होते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर होत होता, मुलांना योग्य दर्जाचा आहार मिळत नव्हता, अशा मुलाकडून तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे पालकांच्या बैठकीत ठरले आहे.
यावेळी शाळा विकास आणि देखरेख समितीचे अध्यक्ष महादेव खेमो गावडे, उपाध्यक्ष पूर्वा परुषोतम नाईक, सदस्य रुपेश वामन गावडे, नानू पांडुरंग देसाई, रेश्मा देसाई, रुपेश गावडे, मधुरा गावडे, सुनंदा मिराशी, सरिता चांभार, पद्माकर देसाई, आरती देसाई, लक्ष्मी सुधीर, चंद्रकला देसाई, अश्विनी गावडे, शंकर मिराशी, नारायण मिराशी, अनिता मिराशी दत्तात्रेय मिराशी, एस नायर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेत तीन शिक्षकही एससी, एसटी समाजातील आहेत, शाळेत कोण कोणत्या समाजाचा आहे याला आम्ही महत्व दिलेले नाही, कोणत्याही अडुगे सिबांधीला जातीवरून त्रास दिलेला नाही, त्यांच्यानी केलेला आरोप खोटा आहे, या प्रकरणी शिक्षकांना त्रास दिला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, वेळ आल्यास आंदोलन तीव्र करू.
— महादेव गावडे अध्यक्ष -शाळा विकास आणि देखरेख समिती
नेत्यांनो, आता तरी लाज वाटेल का?
संडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर बॅनरनी खानापूर शहराचेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांचे सौंदर्य झाकोळून गेले आहे. तालक्यातील नेत्यांनी त्यांचे बॅनर झळकावून स्वत:चे ‘मोठे’पण झळकावण्याची जणू स्पर्धाच भरविली आहे. ज्याचे जेवढे मोठे बॅनर तेवढी प्रसिध्दी अधिक असे समिकरण बनत चालले आहे. पण, रामगुरवाडी गावाच्या वेशीवर लागलेल्या एका बॅनरने या सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची लाज काढली […]