
समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील कौलापूर येथील क्वालिटी ऍनिमल फिड्स प्रा. लि. (पोल्ट्री फार्म) ला प्रदूषण महामंडळाने दणका दिला आहे. तात्काळ पोल्ट्री फार्ममधील कामकाज बंद करावे. तसेच या काळात वीज पुरवठा खंडित करावा, अशी सुचना हेस्कॉमला करण्यात आली आहे. हरकत नोंदविण्यासाठी क्लालिटी व्यवस्थापनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून या काळात महामंडळापुढे मत न मांडल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कौलापूर येथे क्वालिटी ॲनिमल फिड्स कंपनीचे पोल्ट्री फार्म आहे. तेथील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी आणि माश्यांचा प्रादूर्भाव वाढून कौलापूर येथील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. याबाबत सखुबाई पाटील अन्य नागरीकांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत मागील आठवड्यात पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात आली होती. त्यासंबंधीचा अहवाल प्रादेशिक प्रदुषण अधिकाऱ्यांना दि. १५ रोजी प्राप्त झाला.
अहवालात, सदर कंपनी एकक मध्यम-हिरव्या श्रेणी अंतर्गत येते. मंडळाच्या वैध संमतीशिवाय सदर युनिटमध्ये काम सुरू आहे, तसेच हे युनिट एक ब्रीडर फार्म आहे जे फलित अंडी उत्पादनात गुंतलेले आहे. कंपनीची सहा शेडस् असून तेथे २९ हजार कोंबड्या आहेत, असे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.
त्यानुसार दुर्गंधीचा उपद्रव आणि माशांच्या प्रतिबंधासाठी आणि जल आणि वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पुरेशी पावले न उचलता युनिटचे कार्य चालू ठेवल्यास, वनस्पती, प्राणी, सार्वजनिक आरोग्य आणि सर्वसाधारणपणे आजूबाजूच्या पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व तथ्ये जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायद्याच्या कलम २५ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहेत. त्यासाठी क्वालिटी ॲनिमल फीड्स प्रा. लि., (पोल्ट्री फार्म)ने औद्योगिक कामकाज तात्काळ आणि पुढील आदेश येईपर्यंत बंद करावे, हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कंपनीचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश द्यावेत, असे नोटीसीत म्हटले आहे. यामुळे क्वालिटी पोल्ट्री फार्मविरूध्द चाललेल्या अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अंशत: यश आले आहे.
मलप्रभेत मन्नूरचा तरूण बुडाला
खानापूर: येथील मलप्रभा नदीत घाटाजवळ मन्नूर, ता. बेळगाव येथील तरूण बुडाल्याची घटना आज रविवारी (ता.२६) घडली. समर्थ मल्लाप्पा चौगुले (२२) असे या तरूणाचे नाव असून तो कुटुंबीयांसमवेत धार्मिक कार्यासाठी येथे आला होता. कुटुंबीय परड्या भरण्याच्या कार्यक्रमात गुंतले असताना समर्थ हा पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरला होता. घाटाजवळ पाणी अडविण्यात आल्याने भरपूर पाणी आहे. त्यात त्याला पाण्याचा […]