
समांतर क्रांती / खानापूर
आधी मोठा मुलगा आजाराने गेला. त्यातच मुलाच्या जाण्याचा धक्का न सहन झाल्याने वडीलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. ज्याच्याकडे पाहून ‘ती’ माऊली जगत होती, त्यालाही आज मलप्रभा नदीने कवेत घेतले. पाण्यात बुडून त्याचे मृत्यू झाला. आता जगायचे कुणासाठी अशी आवस्था त्या माऊलीची झाली आहे. देवकार्यासाठी आलेल्या त्या महिलेचा शेवटची आशा अशी मातीमोल झाल्याने दोष द्यायचा तर कुणाला? असा प्रश्न त्या माऊलीला पडला आहे.
मन्नूर येथील नागरीक धार्मिक कार्य आणि परड्या भरण्यासाठी येथील मलप्रभा नदीला आले होते. ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाची रेलचेल सुरू असतांनाच एकजण नदीत बुडाल्याने नदी घाटावर एकच गोंधळ माजला. बुडणारा २२ वर्षीय तरूण समर्थ मल्लाप्पा चौगुले होता. हे समजताच त्याच्या आईने एकच आक्रोश केला. तिच्या समोर एकच प्रश्न होता. आता जगायचे तर कुणासाठी?
मोठ्या मुलाच्या आजारातून जाण्याचे दु:ख सहन न झाल्याने नवरा वर्षभरापूर्वीच गेला. त्यातूनही मार्ग काढत कसे तरी एकुलत्या मुलासाठी आईने हाताचा पाळणा केला होता. पण, पोहायला मलप्रभेत उतरलेला समर्थ सुध्दा आज रविवारी (ता.२२) पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला. सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याच्या आईने हंबरडा फोडत आक्रोश चालविला होता.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर..
दुपारी घडलेल्या या घटनेनंतर अथक प्रयत्नांनी मृतदेह हाती लागला. त्यासाठी ह्लपलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या टीमने पाण्यात कॅमेरा सोडून मृतदेहाचा शोध लावला. त्यासाठी या फाउंडेशनचे प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी परिश्रम घेतले. पहिल्यांदाच मलप्रभा नदीतील अशा घटनेत अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अग्नीशामक दलाचे प्रमुख मनोहर राठोड यांनीही मेहनत घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक लालेसाब गवंडी व त्यांचा पोलिस फाटा तैनात होता.
.. आणि सगळ्यांचाच गहिवर दाटला
मलप्रभेवर पायरी पूलाच्या नुतनीकरणानंतर बुडाल्याच्या घटना घटल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच काळानंतर ही घटना घडल्याने घटनास्थळी खानापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. एकीकडे खूप कमी वेळात मृतदेह सापडल्याचे समाधान व्यक्त होत असतांनाच दुसरीकडे समर्थच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचाही गहिवर दाटून आला होता.
खानापूर : नगराध्यक्षपदी मिनाक्षी बैलूरकर, उपनगराध्यक्षपदी जया भुतकी
समांतर क्रांती / खानापूर येथील नगर पंचायतीच्या नगरध्यक्षक-उपनगराध्यक्षांची निवड अविरोध झाल्याने गेल्या कांही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. नगराध्यक्षपदी मिनाक्षी बैलूरकर तर उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची निवड जाहीर करण्यात आली. दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी आरक्षीत झाली होती. त्याला आक्षेप घेत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे गेल्या सहा […]