
समांतर क्रांती / खानापूर
काँग्रेसच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे नेते जणू आसुसले आहेत, त्यांनी श्रेय लाटणे बंद करावे, असा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी दिला आहे. मणतुर्गा येथील शाळेच्या दुरूस्तीसाठी मंजूर झालेल्या निधीबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत खुलासा करतांना भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, असेही सांगितले.
मणतुर्गा (ता. खानापूर) येथील मराठी शाळेची इमारतीचे छप्पर आणि फरशीच्या दुरूस्तीसाठी तालुका पंचायतीच्या अनुदानातून रू. तीन लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सदर निधी मंजूर करून आणण्यासाठी आपण प्रयत्न केल्याची भारतीय जनता पार्टीचे माजी सेक्रेटरी गजानन पाटील यांनी खोटी माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्याबाबत खुलासा करतांना ॲ. घाडी यांनी भाजपवर शरसंधान करीत भाजपच्या नेत्यांनी श्रेय लाटतांना खऱ्या-खोट्याची शहानिशा करावी, असा सल्ला दिला.
ते म्हणाले, मणतुर्गा येथील शाळेची झालेली दुरवस्था आणि त्यासाठी आवश्यक डागडुजीबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते ईश्वर बोबाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचीव व माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे कैफीयत मांडली होती. त्यानुसार डॉ. निळबाळकर यांनी या शाळेच्या डागडूजीला प्राधान्य देत निधीची तरतूद केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर राजकारण करीत एका पदाधिकाऱ्यांने जनतेत संभ्रमावस्था पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
शाळेसाठी आपणच निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगत त्यांनी माध्यमात बातम्या दिल्या आहेत. त्या साफ खोट्या असल्याचा आरोप करीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना श्रेयवाद लाटण्यासाठी इतका आटापिटा न करण्याबाबत कानपिचक्या देण्याचे सौजन्य दाखवावे, असा टोला लगावला आहे. त्याशिवाय सदर शाळा इमारतीच्या डागडुजीसाठी काँग्रेसचे ईश्वर बोबाटे यांच्यासह प्रसाद पाटील व इतरांनी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या नेत्यांनी यापुढील काळात तरी श्रेय न लाटता विकास आणि समस्यांकडे लक्ष द्यावे, असा सामंजस्याचा सल्ला दिला आहे. यावेळी पत्रकार परिषदेला ॲड घाडी यांच्या समवेत ईश्वर बोबाटे, विनायक मुतगेकर, राजू पाटील (शिंदोळी) आदी उपस्थित होते.

चायनिजची खरी चव केवळ ‘येथे’च चाखायला मिळेल…
समांतर क्रांती / खानापूर चायनीज फूड तर सगळीकडेच मिळते, पण चायनीजची खरी चव आमच्याकडे मिळते, ही केवळ जाहिरात नाही. कुटुंबासमवेत चायनीज फुडसह व्हेज बिर्याणीचा खरी चव केवळ हॉटेल गणेशमध्येच मिळेल, असा विश्वास हॉटलेच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. बुधवारपासून (ता.१९) येथील बस स्टँड येथील हॉटेल गणेशमध्ये चविष्ट जेवण थाळीसह डाल-वडा, स्पेशल समोसा आणि आता चायनिजदेखील मिळणार […]