- खानापूर: सख्खा भाऊ पक्का वैरी बनल्याची घटना तालुक्यातील बेकवाड येथे सकाळी उघडकीस आली. जमिनीच्या वादातून यल्लाप्पा शांताराम गुरव (३३) याचा भावानेच खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तालुक्यातील बेकवाडजवळच्या बाळेकोड शिवारातील एका घरासमोर यल्लाप्पा याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर शस्त्रास्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. गेल्या कांही वर्षांपासून भावाभावामध्ये जमिनीच्या वादातून भांडन होत होते. काल बुधवारी झालेल्या भांडणाचे पयार्वसान खूनाच्या घटनेत झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
हेही वाचा..
खानापुरात महिलांचाच दरारा: आ.डॉ. निंबाळकरांविरुध्द धनश्री सरदेसाई?
या घटनेत अन्य एकजण गंभीर असल्याचे समजते. पोलिस अधिक तपास करीत असून संशयीत आरोपीला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
One thought on “भाऊ बनला वैरी, बेकवाडात तरूणाचा खून”