- खानापूर: जटगे ता खानापूर येथे रविवार दि. 22 रोजी ठीक सकाळी नऊ वाजता कापोली ग्रामपंचायत यांच्या संयोगाने विश्वभारती कला क्रीडा संघ बेळगाव व ग्रामस्थातर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नंदगडच्या सुप्रसिद्ध आनंदगड डोंगरच्या पश्चिमेस असलेल्या जंगलमय आणि दुर्गम अशा जटगे गावात मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहान भरवण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. सदृढ भारत, सशक्त देश, बनवण्यासाठी ,आपण सर्वांनी आपले एक पाऊल प्रगतीपथावर नेण्यासाठी स्वईच्छने स्वतःसाठी, समाजासाठी आणि देशासाठी एक पाऊल, नवोदित क्रीडापट्टूना प्रोत्साहन देण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेला आवर्जून बहुसंख्येने उपस्थित रहा, असे आवाहन विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन उपशाखा खानापूर लोंढा विभागचे कार्याध्यक्ष कृष्णाजी खांडेकर यांनी केले आहे.