- खानापूर: येथील शिवाजीनगरात बुधवारी (ता. २५) सिलेंडरचा स्फोट झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली. केवळ सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही. श्री.पाटील यांच्या घरात ही घटना घडली. दुपारी स्वयपाक करतांना अचानक सिलेंडरने पेट घेतला. निवृत्त शिक्षक आनंद पाटील (मुळचे करजगी) यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग विझत नसल्याने ते अग्नीशामक दलाला माहिती देण्यासाठी घराबाहेर आले असतानाच स्फोट झाला. त्यात घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटलांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जोयडा : 140 गावे आणि फक्त 5 पशु अधिकारी
जोयडा : जोयडा तालुक्यातील पशु वैद्यकीय केंद्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. तालुक्यातील 140 गावांना 35 पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज आहे, मात्र येथे फक्त 5 कर्मचारीच काम करीत असून त्यामध्ये दोन डॉक्टर, दोन सहाय्यक आणि एका क्लार्कचा समावेश आहे. सेंद्रिय शेती करणारा तालुका म्हणून नावारूपाला येणाऱ्या या तालुक्याची ही लाजिरवाणी […]