खानापूर तालुक्यातील दोन, महाराष्ट्रातील चार माऊलींची भेट
मलप्रभेच्या उगमस्थानी १४ वर्षानंतर झाली भगिणींची भेट
जांबोटीकर सरदेसाईंना मानपान, पहिल्या ओटीचा मान
कोदाळी, गुंळब, कळसगादे, केंद्रे (वीजघर) येथील माऊली आल्या भेटीला..
कणकुंबी/चेतन लक्केबैलकर: कळसा प्रकल्पामुळे तीन्ही राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आणि याच प्रकल्पामुळे राज्याराज्यातील वाद निर्माण झालेल्या कणकुंबीत १४ वर्षानंतर सहा माऊली भगिणींची भेट झाली आणि कणकुंबीचे वेगळेपण तीन राज्यातील भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. माऊली भेटीच्या नयनरम्य सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद हजारो भाविकांनी लुटला. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून भाविक अक्षरश: जीवा लागी भेटीच्या ओढीने पहाटेपासून कणकुंबीत येत होते. कणकुंबीची माऊली ही सहा बहिणींमध्ये जेष्ठ असल्याने तिच्या भेटीला इतर पाच बहिणी येतात. त्याचा हा गंगा-भगिरथी आनंदसोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. #kankumbi # Goa Maharashtra Karnataka
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि तीन राज्यातील ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक ॠणानुबंधांचा संगम असलेल्या कणकुंबी येथील यात्रेला ८ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. विविध कार्यक्रमांच्या रेलचालीसह रविवार दि. १२ रोजी गंगा-भगिरथी भेटीगाठींचा योग जुळून आला. महाराष्ट्रातील कोदाळी, गुळंब, कळसगादे आणि केंद्रे (वीजघर) येथील माऊली आणि कर्नाटकातील चिगुळे येथील माऊलीदेवींची पालखी यावेळी कणकुंबी माऊलीच्या भेटीला आल्या होत्या. मलप्रभेच्या उगमस्थानी रंगलेला हा मिलनाचा थाट अविस्मरणीय असा होता. कणकुंबीची माऊली मंदिरातून निघून मलप्रभेच्या काठावरील घुळ्याच्या व्हरांड्याकडे निघते आणि तेथे थांबलेलेल्या अन्य पाच बहिणींना (माऊली) भेटते. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. विशेष म्हणजे यावेळी गोव्यातील भाविकांची उपस्थिती लक्षवेधी होती.
कणकुंबी हे घाटमाथ्यावरील प्रदेशाचे प्रवेशद्वार मानले गेल्याने गोव्यातील जनतेत कणकुंबी माऊली विषयीची भक्तीभाव आहे. तर इतर चार माऊली या महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील असल्याने महाराष्ट्रातील अनेक गावांना या यात्रेत मान असतो. एकंदर हा प्रदेश पूर्वीपासून जांबोटीकर सरदेसाई यांच्या संस्थान अखत्यारीत येत होता. त्यामुळे आजही या संस्थानाच्या वारसदारांना यात्रेत मान आहे. आजही त्यांना जानश्रय लाभलेला आहे. जांबोटीकर सरदेसाईंना कणकुंबी येथील खुट्टीपासून मंदिरापर्यंत वाजतगाजत माऊली मंदिरापर्यंत नेले जाते. यावेळी मंदिरातील गाऱ्हाणे, पूजा आणि महाभिषेक त्यांच्या उपस्थितीतच झाला पाहिजे असा दंडक आहे. आताच्या यात्रेतही सध्याचे संस्थानाचे वारसदार श्रीमंत सरकार कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर, त्यांच्या पत्नी आणि भाजपच्या आघाडीच्या नेत्या श्रीमंत राणीसरकार सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई जांबोटीकर यांना सहकुटुंब वाजतगाजत मंदिरापर्यंत नेले गेले. तेथे गेल्यानंतर दिवाजाप्रमाणे श्री. कर्णसिंह आणि सौ. धनश्री यांनी पूजा अर्चा केली.
पूजेनंतर श्री. कर्णसिंह यांनी पुढील कार्यक्रमास चालना देण्याविषयी सूचना केल्या. त्यानंतर देवीला सरदेसाई जांबोटीकर यांची पहिली मानाची ओटी अर्पन करण्यात आली. त्यानंतर माऊलीच्या पालखीचे धुळ्याच्या व्हरांड्याकडे प्रस्थान झाले. हा प्रसंग विलोभनीय असाच होता. कणकुंबी माऊलीचे धुळ्याच्या व्हरांड्यात आगमन झाल्यानंतर जल्लोषी वातारणात आणि जयघोषात सर्व माऊलींची भेटाभेट झाली. यावेळी संबंधीत सर्व माऊलींच्या मानकाऱ्यांचे मानपान, धार्मिक कार्य पार पडले. यावेळचे वातावरण भारावून टाकणारे होते. सरदेसाई जांबोटीकरांच्या अखत्यारीतील सर्व गावातील लोक यात्रोत्सवासाठी कणकुंबीत दाखल झाले आहेत. एकंदर, तब्बल १४ वर्षानंतर कणकुंबीतील हा आनंदसोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक रोज कणकुंबीत दाखल होत आहेत. बुधवार दि. १५ पर्यंत हा उत्सव चालणार आहे.
बेळगाव ग्रामीणमध्ये हवा नवा चेहरा; आर.एम.चौगुले चर्चेत
कारण राजकारण / चेतन लक्केबैलकर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना कोण टक्कर देणार? हा प्रश्न सध्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील चर्चेचा विषय आहे. यावेळीही भाजप या मतदार संघात गारद होणार हे निश्चित असल्याने आता तमाम मराठीप्रेमी आणि हिंदूनिष्ठांची भिस्त म.ए.समितीवर आहे. समितीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची चर्चा आता गावागावात रंगू लागली असून नव्या चेहऱ्याला संधी […]