खानापूर: युवा नेते निरंजन सरदेसाई आणि जेष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज गुरुवारी म.ए. समितीकडे अर्ज दाखल केले. अध्यक्ष गोपाळ देसाई आणि कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदकप्राप्त आबासाहेब दळवी यांनी समितीकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर निरंजन सरदेसाई यांनी त्यांचा अर्ज अध्यक्षांकडे सुपूर्द केला. अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असून इतरही पाच जण इच्छुक अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
आज निरंजन सरदेसाई व आबासाहेब दळवी यांचा अर्ज दाखल करताना सचिव सीताराम बेडरे, गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, शिवाजी पाटील मणतुर्गे, अरुण देसाई नेरसे, ईश्वर बोबाटे मणतुर्गे, राजाराम देसाई हलशीवाडी, खजिनदार संजय पाटील, परशराम कदम हलशी पाटील, प्रसादसिंह दळवी, गोविंद धुळ्याचे आदींसह समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, सध्या तरी निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी आणि मुरलीधर पाटील यांचीच नावे आघाडीवर आहेत. ५१ सदस्यांची निवड समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती उमेदवरीवर शिक्कामोर्तब करणार आहे.
अरविंद पाटलांसाठी सवदींची फिल्डिंग; धनश्री सरदेसाई आघाडीवर
खानापूर: खानापुरातून भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनश्री सरदेसाई जांबोटीकर, विठ्ठल हलगेलर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांची नावे केंद्रीय निवड समितीकडे गेली असल्याचे समजते. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अरविंद पाटील यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजतेभाजपच्या उमेदवारीवर यावेळची राजकारण अवलंबून असल्याने अद्याप समितीने […]