खानापूर: खानापुरातून भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनश्री सरदेसाई जांबोटीकर, विठ्ठल हलगेलर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांची नावे केंद्रीय निवड समितीकडे गेली असल्याचे समजते. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अरविंद पाटील यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते
भाजपच्या उमेदवारीवर यावेळची राजकारण अवलंबून असल्याने अद्याप समितीने उमेदवारी घोषित केलेली नाही. भाजपकडून सुरवातीला हलगेकर आणि सौ. सरदेसाई यांची नावे आघाडीवर होती. पण, बंगळूर येथे सवदी यांनी पाटलांच्या नावासाठी हट्ट धरल्याने तीन नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. दि.8 रोजी यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
अरविंद पाटील हे अलीकडेच पक्षात आल्यामुळे यावेळी त्यांना तिकीट देऊ नये, अशी नेत्यांची मागणी आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास हलगेकर बंडखोरी करतील अशी अटकळ आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान आहे. धनश्री सरदेसाई यांनी पक्षाच्या विविध पदावरून संघटनात्मक कार्य केले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना तिकीट देण्याबाबत पक्षात एकमत आहे. विद्यमान आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या विरोधात महिला आणि मराठा उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता दाट आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास स्थानिक नेते पक्षाशी इमान राखून प्रचार करतील, अशी चर्चा आहे. एकंदर, भाजपच्या उमेदवरीवरून इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.
भाजपकडून तालुकाध्यक्ष संजय कुबल आणि जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हेदेखील इच्छुक होते. पण नेत्यांनी यावेळी त्यांचा सुतराम विचार केलेला नाही. कोचेरी यांनी काही महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली होती, पण उमेदवारी मिळणार नाही, हे समजताच त्यांचा जोर ओसरला.
येत्या २४ तासात विजांसह पावसाची शक्यता
बंगळूर: येत्या २४ तासात राज्यातील १२ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हिंदी महासागरातील वेगवान हालचालीमुळे वातावरणात कमालीची आर्द्रता तयार झाल्याचा हा परिणाम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या काळात ताशी ३० ते ४० कि. मी. वेगाने वारे वाहणार आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातदेखील हा पाऊस बरसणार आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात […]