खानापूर: कुप्पटगीरी (ता.खानापूर) येथील समितीचे जेष्ठ नेते संभाजीराव परशराम पाटील-गुरुजी (वय 87) यांचे वृद्धापकाळाने आज गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
गोवा मुक्तीनंतर त्यांनी गोव्यात 36 वर्षे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. ते काही काळ पणजी येथील शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. त्यांनी खानापूर कृषी पत्तीन संघाचे संस्थापक संचालक आणि म.ए. समितीचे अनेक वर्षे सरचिटणीस पद भूषविले होते. शिवाय त्यांनी १० वर्षे पत्रकारीताही केली होती. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. समांतर क्रांती परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
निष्ठावंत कार्यकर्ते जोशींच्या भूमिकेशी असहमत
कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद लवकरच भूमिका मांडणार निपाणी : माजी आमदार प्रा सुभाष जोशी यांच्यां नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर पडत आहे. अशी माहिती निपाणी येथील सरप्रेमी […]