खानापूर: वृक्ष तोडीमुळे खानापूर-रामनगर महामार्गाचे काम वादात सापडले असतानाच आता जांबोटी-चोर्ला दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. नुकताच तोडल्या जाणाऱ्या झाडांची आरेखन करण्यात आले असून पर्यावरण प्रेमींकडून वृक्ष तोडीस विरोध होत आहे.
गोव्याला जोडणाऱ्या खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदारीकरणासाठी सुमारे ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती. त्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात जाऊन महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. परिणामी, प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत. आता पुन्हा जांबोटी ते साखळीपर्यंतच्या चोर्ला राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. गेल्या महिनाभरापासून या मार्गावरील झाडांचे आरेखन करण्याचे काम सुरू आहे. लवकरच या झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. पूर्वी हा महामार्ग साडेतीन मीटर रुंदीचा होता. कै. प्रल्हाद रेमानी यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात तो साडेपाच मीटर रुंद करून घेतला. रामनगर महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे सध्या गोव्याला होणारी वाहतूक चोर्लामार्गे वळली आहे. परिणामी अपघातांची संख्या वाढल्याने रुंदीकरणाचा घाट घालण्यात आला आहे.
खरंतर, खानापूर-रामनगर महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लावल्यास चोर्ला महामार्गावरील ताण ५० टक्क्यांनी कमी होऊन प्रवास सुकर होऊ शकतो, परंतु त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यात निसर्गाची मोठी हानी संभावणार असल्याने पर्यावरण प्रेमी व्यथित झाले आहे. त्यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शविली असून या मार्गाची अवस्थाही रामनगरप्रमाणेच होणार आहे. स्थानिक नागरिक आणि संघटना मात्र रस्ता रुंदीकरण व्हावे, यासाठी जागृती करीत आहेत. अपघात टाळण्यासाठी रुंदीकरण महत्वाचे असल्याचे मत यावेळी आमटे येथील माजी ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मण कसरलेकर यांनी व्यक्त केले आहे.
तुम्हाला माहीत आहे का, पहिलं आधार कार्ड कुणाला मिळालं होतं?
28 जानेवारी 2009 रोजी केंद्र सरकारने आधार कार्डची संकल्पना मंजूर करून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेला मूर्तरुप दिले. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे बारा वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2010 रोजी पहिले आधारकार्ड देण्यात आले. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तांबाळी गावातील महिला रंजना सोनवणे यांना ते मिळाले. त्यानंतर त्यांचे पती सदाशीव यांनाही आधारकार्ड प्राप्त झाले होते. […]