- सध्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड हवेच. बॅंक खाते, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, सगळेच आता आता आधार कार्डशी लिंक केले जात आहे. आता तर मतदार कार्डदेखील आधारशी जोडले जात आहे. एकुणच काय तर `आधार’शिवाय भारतीय`निराधार’ बनले आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का, देशातील पहिले आधार कार्ड कुणाला मिळाले होते.
28 जानेवारी 2009 रोजी केंद्र सरकारने आधार कार्डची संकल्पना मंजूर करून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेला मूर्तरुप दिले. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे बारा वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2010 रोजी पहिले आधारकार्ड देण्यात आले. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तांबाळी गावातील महिला रंजना सोनवणे यांना ते मिळाले. त्यानंतर त्यांचे पती सदाशीव यांनाही आधारकार्ड प्राप्त झाले होते. हे कुटुंब शेतकरी आहे. AAdhar Card, Ranjana Sonwane
पहिला आधारकार्ड मिळाल्यानंतर रंजना सोनवणे यांचे त्यावेळी मोठे कौतूक झाले होते. त्यांच्या आधारकार्ड तिरणाचा शासकीय सोहळाही साजरा करण्यात आला होता.आता हेच आधारकार्ड भारतीयांची ओळख बनले आहे. आधार नसेल तर तुम्ही`निराधार’ आहात.
झंझावात… आवाज फक्त आर.एम.चौगुले यांचाच!
बेळगाव: ग्रामीण मतदार संघात सध्या आर.एम. नावाचं वाढलं घोंघावत आहे. त्यांना गावागावातून मिळणारा पाठिंबा आणि स्वयंस्फूर्तीने दिली जाणारी दाद पाहता मतदानाआधीच त्यांच्या विजयाची नांदी सुरेल झाली आहे. सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि धडाडीमुळे आपला माणूस म्हणून आर.एम.चौगुले यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. विविध कार्यक्रमांसाठी ते गावागावात फिरत आहेत. प्रत्येक गावात नागरिक, तरुण आणि महिला त्यांना पाठिंबा […]