खानापूर: स्वत:स शिवसेनेचे उमेदवार म्हणवून घेणारे के.पी.पाटील यांचा सेनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी आणि जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी सेनेचा समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठींबा असून शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, आवाहन केले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्प्न पूर्ण होर्इपर्यंत सीमाभागात सेना कायम म.ए.समितीच्या पाठीशी असेल. याच धोरणामुळे सेना समितीला पाठींबा देताआली आहे. असे असतांना के.पी.पाटील यांनी स्त:चा अर्ज दाखल करून मराठी भाषकांत संभ्रमास्था पसरवली आहे. अनावधानाने त्यांना पक्षाचा बी फॉर्म देण्यात आला होता. तरीही त्यांना पपक्षाच्यावतीने माघार घेण्याची सूचना करण्यात आल्यानंतर त्यांनी आपला आडमुठेपणा सोडलेला नाही. त्यांचा सेनेशी कोणताही संबंध नसून सेनेचा समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठींबा आहे. मराठी भाषिकांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खानापुरात प्रशासनाची दादागिरी; समितीचा फलक पुन्हा काढला
खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोरील नामफलक आज पुन्हा हटविण्यात आला. मराठी मते केवळ समितीलाच मिळणार असल्याने हा अट्टाहास चालला असल्याचे आता स्पष्ट झाले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव-पणजी महामार्गावर गणपती मंदिरच्या बाजूला समितीचे संपर्क कार्यालय आहे. पहिल्यांदा नगर पंचायतीची परवानगी नसल्याचे कारण दाखवून फलक काढण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला नाही. रितसर परवानगी […]