अंदाज अपना अपना..
समितीचा प्रचारातील धडाका पाहता यावेळी बेळगाव दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकणार हे निश्चित आहे. तर बेळगाव उत्तर, खानापूर आणि यमकनमर्डी मतदारसंघात समितीला पराभव सहन करावा लागू शकतो.
बेळगाव: मतमोजणीचा काऊंट डाऊन आता काही वेळातच सुरू होणार असून बेळगाव आणि खानापुरातून समितीचा भगवा किती जागांवर फडकणार? याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकात सत्तापालट होणार का? याबाबत प्रचंड हुरहूर आहे.
मागील 2013 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली होती. काठावरची सत्ता कुणालाच अपेक्षित नसल्याने काँग्रेस आणि भाजपने जंगजंग पछाडले. त्याचा परिणाम सिमभागातही दिसून आला. म.ए.समितीत यावेळी उत्साही वातावरण आहे. पाच जागांवर समिती उमेदवारांनी निवडणूक लढवली.यापैकी बेळगाव दक्षिण मतदार संघातून रमाकांत कोंडुस्कर हे भाजपचे अभय पाटील यांना मात देणार हे जवळपास निश्चित आहे. त्यांच्यामुळेच बेळगाव ग्रामीण, उत्तर आणि खानापूर मतदार संघात वातावरण पेटले होते. पण, मतदारांनी कुणाला कौल दिला आहे.हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण मतदारसंघात समितीला आशा आहे. तेथून आर.एम.चौगुले विजयी होतील, असा विश्वास मराठी भाषिकांना वाटतो. उत्तरमध्ये अमर येळ्ळूरकर यांची भाजपचे डॉ. रवी पाटील व कॉंग्रेससचे राजू शेठ यांच्याशी लढत आहे. ही लढतही दमदार झाली असून कोण ठरणार उत्तरचा उत्तराधिकारी हे मतमीजणीनंतर समोर येणार आहे. येथे समितीला संधी मिळण्याबाबत साशंकता आहे. खानापूर मतदारसंघात चौरंगी लढत झाली आहे. यावेळी समितीला संधी होती, पण ती दवडली गेल्याचे चित्र मराठी भाषिकांना हैराण करणारे आहे. परिणामी, भाजपला संधी उपलब्ध झाली असली तरी काँग्रेस आणि निजदच्या उमेदवारांनी किती टक्के मराठी मते पदारात पाडून घेतली यावर विजयाचे समीकरण अवलंबून आहे.
मतमोजणी प्रक्रियेला बेळगाव येथील आरपीडी कॉलेजमध्ये सुरवात झाली असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची मुसंडी;खानापुरात भाजप
आकरा जागांवर विजय; भाजपला धक्का बेळगाव: काँग्रेसने पुन्हा भाजपचा उधळलेला सत्तावारू राखत संपूर्ण राज्यात भाजपचा धुव्वा उडविला. बेळगाव जिल्ह्यातदेखील १८ पैकी ११ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिलविला. मागील विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १३ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले होते. ऑपरेशन कमळच्या वेळी आणखी तीन आमदारांनी भाजपचा रस्ता गाठला होता. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ पाच आमदार […]