बेळगाव: बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथे एका तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. महांतेश रुद्राप्पा कर्लिंगन्नावर (वय २३, रा.मारिहाळ) असे या तरूणाचे नाव असून चार-पाच जणांच्या टोळक्याने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मारिहाळ पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेच्या पोलिस उपायुक्त पी.व्ही.स्नेहा यांनी घटनास्थळी भेट देऊन मारिहाळ पोलिसांना सूचना केल्या. मारेकऱ्यांचा शोध जारी असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यात पुन्हा अशा घटनांना सुरूवात झाल्याने खळबळ माजली आहे.
सिध्दरामय्या: कार्यकाल पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री
विशेष/चेतन लक्केबैलकरकर्नाटकात आतापर्यंत केवळ दोनच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यात १६ व्या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे सिध्दरामय्या हे दुसरे मुख्यमंत्री आहेत, तर एस. निजलिंगप्पा हे ५ वर्षे ३४३ दिवस इतका प्रदीर्घ आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भुषविणारे पहिले मुख्यमंत्री होते. तर त्यांच्यानंतर सिध्दरामय्या यांनी अधिक काळ आणि कार्यकाल पूर्ण करीत ५ वर्षे ४ […]