जांबोटी: शेतात काम करीत असताना दोन अस्वलांनी महिलेवर हल्ला केल्याची घटना आज शनिवारी सकाळी हब्बनहट्टी येथे घडली. रेणुका इराप्पा नाईक (वय 60) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. सादर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
कै.रेमाणींनी घेतली होती मराठीतून शपथ आणि हलगेकरांनी?
बंगळूर: विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्यादिवशी विधानसभेच्या आमदारांनी शपथ घेतली. खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर कोणत्या भाषेत शपथ घेणार याकडे खानापूर तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पण, त्यांनी तालुकावासीयांची घोर निराशा केली. कन्नडमध्ये शपथ घेणारे ते तालुक्याचे दुसरे आमदार ठरले. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कन्नडमधून शपथ घेत माय मराठीला हरताळ फासला होता. आता […]