खानापूर: तालुका कुस्तीगीर संघटनेने आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महान भारत केसरी सिकंदर शेखने (मोहोळ) हरयाणा केसरी विशाल भोंडू याला दुहेरी पट काढत अस्मान दाखविले. रात्री सव्वानऊ वाजता लागलेल्या या कुस्तीचा निकाल आवघ्या तेरा मिनिटात लागला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत संदिप मोटे (सांगली) याने मुधोळच्या सुनिल फडतरेचा पोकळ घिस्सा डावावर पराभव करून कुस्तीशौकीनांची वाहवा मिळविली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दावणगिरीचा कार्तिक काटे यावे विजय मिळविला. आखाड्यात ५० हून अधिक कुस्त्या झाल्या त्यातील ४ कुस्त्या बरोबरीत सुटल्या. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सत्कारानिमित्त हा आखाडा भरविण्यात आला होता. पण, ते परगावाहून वेळेत पोहचू शकले नाहीत.
होतकरू, तरूण उद्योजक विकास देसाई
जिद्द असे तर सर्व कांही सिध्द करता येतं. अर्थातच त्यासाठी कठोर मेहनत घेत सातत्य टिकवून ठेवण्याची गरज ही असतेच. ताकद ही केवळ आपल्या दंडात असून चालत नाही. तर ती आपल्या आचार-विचारातून सुध्दा दिसली पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर अत्यंत कमी वयात यशाचे गाठणारे विकास मोहनराव देसाई हे असेच एक व्यक्तीमत्व ज्यांनी तालुक्यातील तरूणांसमोर आदर्श ठेवला आहे. आज […]