जिद्द असे तर सर्व कांही सिध्द करता येतं. अर्थातच त्यासाठी कठोर मेहनत घेत सातत्य टिकवून ठेवण्याची गरज ही असतेच. ताकद ही केवळ आपल्या दंडात असून चालत नाही. तर ती आपल्या आचार-विचारातून सुध्दा दिसली पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर अत्यंत कमी वयात यशाचे गाठणारे विकास मोहनराव देसाई हे असेच एक व्यक्तीमत्व ज्यांनी तालुक्यातील तरूणांसमोर आदर्श ठेवला आहे. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांची अल्पशी ओळख करून देणारा लेख..
पडलवाडी हे छोटे गाव. गाव छोटे असले तरी समस्या मोठ्या. अगदीच दुर्गम. मुलभूत म्हणाव्या अशाही सुविधा पोहचलेल्या नाहीत. अशा गावातून एक तरूण ध्येयाने पछाडून गावाच्या सीमा ओलांडून स्वत:चे साम्राज्य उभे करतो, तेव्हा त्याचे कौतूक व्हायलाच हवे. विकास देसाई हे पडलवाडीतील शेतकरी कुटुंबातील. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कापोली आणि हलशी येथील मराठी शाळेत झाले. पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नंदगड येथे पूर्ण केले. खानापुरात वाणिज्य विभागाची (बी.कॉम) पदवी प्राप्त केली. सहसा पदवीपर्यंतचे शिक्षण झाले की या भागातील विद्यार्थी मिळेल ती नोकरी करण्यासाठी धडपडत असतांनाच्या काळात विकास यांनी बेळगाव येथील नामांकित कॉलेजमधून एमबीए केले.
उद्योग व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांवर यशस्वी कामगिरी बजावली. पण, त्यांना त्यांचा गाव, तालुका खुणावत होता. त्यांनी आपली पावले पुन्हा खानापूरकडे वळवित त्यांनी रिअल इस्टेटमध्ये जम बसविला. त्यांनी अनेक गोरगरिब कुटुंबांना न्याय मिळवून दिला. हे सर्व कांही करीत असतांना त्यांनी कायदा पदवीचे (एलएलबी) शिक्षण पूर्ण केले. एका खेडेगावातून आलेले विकास यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच स्वत:सह समाजाच्या विकासात झोकून दिले आहे. समाजात आपले असे अढळ स्थान त्यांनी निर्माण केले आहे. त्यांचा सुरूवातीपासूनचा संघर्ष आणि समाजासाठी आपण कांहीतरी केलं पाहिजे, यासाठीची आताची धडपड कौतूकास्पद आणि अभिनंदनीय आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका छत्रिय मराठा परिषदेच्यावतीने हार्दिक शुभेच्छा..
- श्री. रमेश पाटील, सचिव छ.मराठा परिषद, खानापूर
मराठा समाजाचे कुशल संघटक: रोहित साठे
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या […]