खानापूर: प्रियकराच्या छळाला कंटाळून तरूणीने विष प्राशन करून जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील निडगल येथे घडली. शनिवारी यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनंतर सदर तरूणीच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मला सोडून इतर कुणाशी लग्न केल्यास एकत्र काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्न मोडणाऱ्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून निडगल येथील प्रियांका कल्लाप्पा कांबळे (22) हिने २५ मे रोजी घरात कुणी नसतांना विष प्राशन केले होते. तिच्यावर उपचार सुरू असतांना दि. १ जून रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शनिवारी (दि. ३) खानापूर पोलिसात तिचे वडिल कल्लाप्पा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रियकर सुनिल जोतिबा सुंडकर (रा. हत्तरगुंजी) यास पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो प्रियांकाला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता, त्याच्या या त्रासाला कंटाळून आपल्या मुलींने आत्महत्या केली, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक रवि नायक अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा..
बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग: उद्योजकांना अभय
समांतर क्रांती विशेष बेळगाव ते धारवाड लोहमार्गासाठी नंदिहळ्ळी परिसरातील शेकडो एकर जमिनी संपादीत करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. उच्च न्यायालयाने शेतकर्यांना दिलासा दिला होता. पण, मनाईहुकुम उठल्यानंतर जमिन संपादीत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकीकडे शेतकर्यांचा विरोध आणि त्यासाठीची आंदोलने बळाचा वापर करून चिरडली जात […]