अशोकनगर येथील चंद्रव्वा यांचा मुलगा गवंडी कामानिमित्त बाहेरगावी असतो. ग्राम पमचायतीकडून त्यांना घर ममजूर झाले होते. घर बांधून पूर्ण झाले तरी पंचायतीकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे कधीतरी निधी मिळेल, या आशेवर त्यांनी शेजारी आणि सावकाराकडून उसनवारी करून कर्ज घेतले होते. देणेकऱ्यांनी पैशासाठी तगादा लावल्यामुळे चंद्रव्वा यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
One thought on “ग्राम पंचायतीकडून निधी न मिळाल्याने कर्जबाजारी महिलेची आत्महत्या”