कणकुंबी: चोर्ला घाटात दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चाक्काचूर झाला असून केवळ सुदैवाने या अपघातात जिवितहानी टळली.
गोव्याहून कणकुंबीच्या दिशेने येणाऱ्या कारला कणकुंबीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारने चोर्ला घाटातील वळणावर समोरासमोर जोराची धडक दिली. यावेळी एका कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी झाला. त्यांना तात्काळ इस्पितळात हलविण्यात आले. बराचवेळ अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच होती, त्यामुळे कांही काळ चोर्ला महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा….
भूत्तेवाडी येथे वृद्धाचा खून
नंदगड: डोकीत वार करून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना खानापूर तालुक्यातील भूत्तेवाडी येथे उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लप्पा सुतार (७५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नंदगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.