मोठ्या पगाराची नोकरी किंवा बेफाम पैसा मिळवून देणारा व्यवसाय, चारचाकी गाडी आणि टोलेजंग बंगला, सुदरशी पत्नी आणि एखादे मुलं, ही आजच्या तरूणांची सर्वसामान्य स्वप्नं आहेत. त्याच्या पलिकडे जाऊन आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची संवेदनशीलता आजचा तरूण हरवत चालला आहे. केवळ चार भिंतीतलं विश्व आजच्या तरूणांना खुणावत असतांना एखादा तरूण स्वयंप्रेरणेने समाजाच्या भल्याचा विचार मांडतो. केवळ घोषणाबाजी न करता स्वत: मैदानात उतरतो आणि समाजाच्या तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जातो, तेव्हा रखरखत्या वाळवंटातील ओऍसिस जसे तहाणलेल्या जीवाला दिलासा देऊन जाते, तसाच अनुभव विविध समस्यांनी पिचलेल्या लोकांना येतो. अशाच प्रकारे एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होऊन खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारे तरूण-तडफदार व्यक्तीमत्व म्हणजे छत्रिय मराठा परिषदेचे खानापूर तालुकाध्यक्ष अभिलाष हिंदूराव देसाई. आज सोमवार दि. १२ रोजी त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा..
बालपण आणि शिक्षण
पडलवाडीसारख्या दुर्गम खेड्यात अभिलाष यांचा जन्म झाला. वडिल वकिल असल्याने त्यांचे बालपण खानापूर शहरातील निंगापूर गल्लीत गेले. सर्वोदय हायस्कूलमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. तर पुढील शिक्षण बेळगावमधील विविध महाविद्यालयांत झाले. त्यांनी तंत्रज्ञान (बी.टेक) तसेच व्यवसाय व्यवस्थापन (एम.बी.ए) पदवी घेतली. त्याशिवाय जर्मनीतील वर्ल्डवर्फ विद्यापिठातूनही त्यांनी शिक्षण घेतले. खूप कमी वयात त्यांनी स्टॉक मार्केटसारख्या व्यवसायात पदार्पन करून स्वत:चे स्थानमान उंचावले. रिअल इस्टेटमध्येही त्यांनी जम बसविला. हे सगळं कांही करीत असतांना आपण आपल्या समाजासाठी कांहीतरी केले पाहिजे, या भावनेतून त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले.
सामाजिक कार्य
कोरोना महामारीच्या काळात अभिलाष देसाई यांची खरी ओळख खानापूर तालुक्याला झाली. त्यांनी स्थापन केलेल्या जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ५० हून अधिक गावांना मदत पोहचविली. शाळेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. एवढंच नाही तर नंतरच्या काळातही ते त्याच उत्साहाने तालुक्यात कार्यरत राहिले आहेत. त्यांनी दोन लाख वह्यांचे वितरण केले. सलग दोन वर्षे आलेल्या महापूरातील अपादग्रस्तांना त्यांनी मोठा आर्थिक आणि मानसिक आधार दिला. भ्रष्ट पंचायत विकास अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अहोरात्र ७२ तास तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे धरले. त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्याला निलंबीत करावे लागले. आतापर्यंत त्यांनी ५२ मोर्चे काढले असून त्यातील बहुतेक मोर्चांना सकारात्मक बळ मिळाले. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच फ्लडलाईट हॉलिबॉल स्पर्धा भरविल्या. तसेच क्रिकेट आणि फूटबॉल स्पर्धा भरवून तालुक्यातील तरूणांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न अभिलाष देसाई यांनी चालविला आहे.
मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य
खानापूर तालुक्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजासाठी अभिलाष यांनी दिलेले योगदान निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. गतवर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली खानापुरातील पाटील गार्डनमध्ये गुरूवंदना कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. गुरूजी सद्गुरू मंजूनाथ भारती (गवीपूरम्-बंगळूर) यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी अभिलाष यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये भगव्या ध्वजाचे वितरण करून जनजागृती करतांना समाजाने एकसंध राहण्याचे आवाहन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल ते आक्रमक आहेत. त्यासाठी निघालेल्या सुवर्णसौधवरील मोर्चात मंजुनाथ भारती स्वामींसमवेतचा त्यांचा सहभाग त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा ठरला. मराठा समाजातील तरूणांनी एकत्र यावे, व्यसनांपासून दूर राहून स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारावेत, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत. तरूण-तरूणींसाठी मार्गदर्शन शिबीरे भरविण्याची त्यांची योजना आहे.
नेत्रदानाचा संकल्प
अभिलाष यांचे जीवन स्वच्छंदी आहे. चित्रपट पाहणे, ड्रायव्हिंग करणे हे त्यांचे आवडते छंद आहेत. असे असले तरी छ. शिवाजी महाराज हे त्यांचे रोल मॉडेल आहेत. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांचे आदर्श असून त्यांच्याकडून आपल्याला समाजासाठी लढण्याची उर्जा मिळाली असे ते मानतात. स्वत:च्या आरोग्याच्या अनेक तक्रारी असल्या तरी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवितांना ते कधीच त्याचा बाऊ करीत नाहीत. ते कोणत्याही क्षणी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जातात. ब्रम्हचर्य व्रत घेतलेले अभिलाष यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला असून ही प्रेरणा त्यांना अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यामुळे मिळाली असल्याचे ते सांगतात.
तरूणांच्या गळ्यातील ताईत
अभिलाष यांनी खूप कमी कालावधीत त्यांचे असे वेगळे प्रस्त निर्माण केले आहे. त्यांचे विविध पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. एनकेन प्रकारे आपल्या समाजाचे भले झाले पाहिजे, एवढाच आपला उद्देश असून राजकारणात प्रवेश करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. तरूणांसाठी त्यांनी हाती घेतलेल्या कामांमुळे ते तरूणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!
- कॅ.चांगाप्पा पाटील, उपाध्यक्ष छत्रिय मराठा परिषद
भुत्तेवाडीतील खूनाचा छडा, दोघांच्या मुसक्या आवळल्या
या खून प्रकरणी नागोजी परशराम सुतार (वय ५५) व ओंकार कृष्णा सुतार (वय २६) यांना पोलीसांनी अटक केली असून त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. शनिवारी सकाळी लक्ष्मण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी या घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरविली. संशयीत आरोपी नागोजी हा मयत लक्ष्मणच्या मेहुणीचा मुलगा असून त्याचा लक्ष्मण यांच्या […]