- नंदगड: भुत्तेवाडी येथील वृध्दाच्या खूनाचा रहस्यभेद करण्यात नंदगड पोलिसांना अवघ्या २४ तासात यश आले. याप्रकरणी दोघा संशयीतांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शनिवारी लक्ष्मण यल्लाप्पा सुतार (वय ७५) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. जागेच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या खून प्रकरणी नागोजी परशराम सुतार (वय ५५) व ओंकार कृष्णा सुतार (वय २६) यांना पोलीसांनी अटक केली असून त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. शनिवारी सकाळी लक्ष्मण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी या घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरविली. संशयीत आरोपी नागोजी हा मयत लक्ष्मणच्या मेहुणीचा मुलगा असून त्याचा लक्ष्मण यांच्या जागेवर डोळा होता. सदर जागा त्याला देण्यास विरोध करीत असल्याने शनिवारी ओंकार याच्या साथीने नागोजींने लक्ष्मण यांचा काटा काढला. Bhuttewadi murder
लक्ष्मण यांची पत्नी बाहेरगावी गेल्याची खात्री करून नागोजी आणि ओंकार यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर ओंकारने लक्ष्मण यांचे पाय धरून ठेवले तर नागोजीने त्यांच्या डोकीत दगड घातला. त्यानंतर पुन्हा कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांचा निर्घून खून केला. संशय येऊ नये यासाठी त्यांनी दगड आणि कुऱ्हाड इतरत्र फेकून दिली होती. वृध्दाचा अशा पध्दतीने खून झाल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे असतांनाच सदर खूनात नागोजीचा हात असण्याची शंका आल्याने त्याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा रहस्यभेद झाला.Two arrested in Bhuttewadi murder case. The murder was due to a dispute over the land.
गेल्या कांही वर्षांपासून लक्ष्मण आणि नागोजी यांच्यात जागेवरून वाद सुरू होता. लक्ष्मण यांनी विरोध करून जागा देण्यास नकार दिल्याने नागोजीच्या मनात राग होता.नागोजीने संबंधीत जागेवर घर बांधण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या. पण, पंचायतीत तक्रार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने लक्ष्मण यांचा निर्घूण खून केला. मात्र नंदगड पोलीसांनी आवघ्या २४ तासात या प्रकरणाचा छडा लावून दोघांना जेरबंद केले. त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
अरविंदराव जोमात, बाकी सगळे कोमात!
समांतर क्रांती विशेष निवडणूक म्हटलं की, कार्यकर्त्यांचा जोष, नेत्यांचा हैदोस ठरलेलाच असतो. सहकारी संस्थांच्या निवडणुकांतही गावपातळीवरचे राजकारण उफाळून उठते. जुन्या-नव्या वादांना फोडणी देऊन इस्पित साधण्याचे कौशल्य नेते मंडळी पणाला लावतात. त्यात नेत्यांचा खेळ होतो आणि सर्वसामान्यांचा जीव जातो. पण, त्याची फिकीर कुणालाच नसते. सध्या खानापूर तालुक्यातील २५ कृषी पत्तीन सहकारी संघांच्या निवडणुकांचे रान पेटले आहे. […]