खानापूर: नंदगड उत्तर विभाग कृषीपत्तीन संघाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी वर्चस्व कायम राखले, तर दक्षिण विभाग कृषी पत्तीनची निवडणूक अविरोध झाली. उत्तर विभाग संघाच्या एकुण १२ पैकी पाच जागांसाठी निवडणूक झाली. सहा उमेदवार रिंगणात होते. त्यातील रुक्माण्णा झुजवाडकर हे ११९ मतांनी पराभूत झाले तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे कल्लाप्पा मडवाळकर, महाबळेश्वर कोलेकर, विरेश वाली, शंकर बस्तवाडकर, हणमंत नाईक हे विजयी झाले. दिव्या पाटील, लक्ष्मी हेंडोरी, जयवंत खानापूरकर, कल्लाप्पा बावकर, दुर्गाप्पा तळवार, रामचंद्र मादार, महांतेश मुतगी यांची अविरोध निवड करण्यात आली.
दक्षिणची निवड अविरोध
दक्षिण विभाग कृषी पत्तीन संघाची निवडणूक अविरोध पार पडली. सत्ताधारी संचालकांची निवड करण्यात आली. यामध्ये माजी जि.पं.सदस्य पुंडलिक कारलगेकर, पी.एच.पाटील, राहूल पाटील, दिलीप पाटील, व्यंकट केसरेकर, पार्वती पाटील, रेणुका हलशीकर, संभाजी पारिश्वाडकर, महादेव पाटील, कृष्णा वड्डर, अर्जून खणगावी, चंद्रकांत घाडी यांचा समावेश आहे.
‘स्कॅम २००३- अ तेलगी स्टोरी’ सप्टेंबरमध्ये रिलीज होणार
समांतर क्रांती विशेष scam-2003-a-telgi-story: देशाची अर्थव्यवस्था हादरवून सोडलेल्या बनावट स्टँप घोटाळ्यावर अधारित ‘स्कॅम २००३- अ तेलगी स्टोरी’ ही वेबसेरीज २ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. तशी घोषणा सोनी लिव्हच्या सोशल मिडिया अकाउंटवर ही घोषणा केली आहे. रंगभूमीवरील अभिनेता गगन देव हा या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अन् याचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी […]