नंदगड: येथील दक्षिण प्राथमिक कृषीपत्तीन संघाच्या अध्यक्षपदी पी.एच.पाटील यांची तर उपाध्यक्षपदी माजी जि.पं.सदस्य पुंडलिक कारलगेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संचालक राहुल पाटील, दिलीप पाटील, व्यंकट केसरेकर, पार्वती वि.पाटील, रेणुका गुं.हलशीकर, संभाजी पारिश्वाडकर, महादेव पाटील, कृष्णा वड्डर, अर्जुन खणगावी, चंद्रकांत घाडी, व्यवस्थापक मुकुंद पाटील आणि श्रीनाथ पाटील आदी उपस्थित होते.
प्रवास केला फुटकचा, प्रश्न पोटातल्या आगीचा!
समांतर क्रांती ब्युरो कर्नाटक सरकारच्या महिलांना फुकटात बस प्रवासाच्या योजनेमुळे सध्या अनेक गमती-जमती घडत आहेत. बायकांच्या माहेरच्या फेऱ्या वाढल्याने नवरे तर त्रस्त आहेत, माहेरचे लोकही हैराण आहेत. राज्यातील मंदिरातील महिलांची गर्दी वाढल्याने मंदिर प्रशासन हवालदिल आहेत. हे सगळं स्वाभावीक होतं, पण त्याव्यतिरिक्त अनेक गमती-जमती या मोफत बसप्रवासामुळे घडत आहेत. एका महिलेच्या अशाच बस प्रवासामुळे खानापूर […]