समांतर क्रांती…
लोंढा येथील माजी जि.पं.सदस्य मुगुटसाब धारवाडी यांचे सुपुत्र अबुबकर याने नुकताच झालेल्या नीट परिक्षेत १७४६ वा रँक पटकाविला आहे. त्याला आता डॉक्टर बनायचे आहे. विशेष म्हणजे त्याचा भाऊ आणि तीन बहिणीदेखील डॉक्टर आहेत. तुम्ही राजकारण का सोडला यावर ‘मुलांच्या शिक्षणासाठी’ असे उत्तर देणारे मुगूटसाब धारवाडी यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवितांना त्यांच्या पाचही मुला-मुलींना उच्च शिक्षण देण्यात कोणतीच कसर सोडली नाही.
त्यांचा कनिष्ठ सुपुत्र अबुबकर मुगुटसाब धारवाडी याने ७२० पैकी ६८० गुण मिळवीत देशात १७४६ वा रँक पटकाविला. त्यासाठी अथक परिश्रम आणि अभ्यासातील सातत्य कामी आल्याचे तो सांगतो. त्याच्या तीन बहिणी आणि एक भाऊ डॉक्टर असून अबुबकरलाही डॉक्टरच व्हायचे आहे. मोठी बहिण रूखिया हिने बीएचएमएस केल्यानंतर ती दिल्लीत लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करीत आहे. आयेशा हीने मात्र बीएचएमएस केल्यानंतर आपले गाव आणि परिसरातील सामान्यांना आरोग्य सेवा देण्याचा मनोदय पूर्ण केला. ती सध्या दररोज शेकडो रुग्णांना सेवा पुरवित आहे. बिबि खतुजा आणि मुस्तफा यांनीही नीट परिक्षेत ३८४ आणि २३०० वा रँक पटाकावीत डॉक्टर होण्याचे त्यांचे आणि त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आता अबुबकरनेदेखील नीटमध्ये देशात १७४६ आणि खानापूर तालुक्यात अव्वल क्रमांक टकावत लोंढ्याचे नाव देशाच्या नकाशावर नोंदविले आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. त्याला डॉ. प्रविणकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
One thought on “एक भाऊ आणि तीन बहिणीनंतर अबुबकरला बनायचे आहे डॉक्टर”